मधुबनी पेंटिंग

Surface ornamentation techniques म्हंटलं की एम्ब्रोईडरी, आरी वर्क, पेंटिंग  हे वेगवेगळे प्रकार आहे. त्यात पेंटिंग सुद्धा अविभाज्य घटक आहे. त्यातील एक महत्त्वाचि पेंटिंगमधुबनी पेंटिंग , प्रत्येक देशाचा, त्याच्या कलेचा वेगळा वारसा आहे आणि कलेचा वारसा परंपरेने जोपासला जातो. भारत हा सांस्कृतिक देश आहे. त्यात विविध कला जोपासल्या जातात. खरंतर पारंपारिक भारतीय कला ही कलाकारांना प्रेरित करते. अशीच एक कला म्हणजे मधुबनी पेंटिंग किंवा त्याला मिथीला (Mithila) पेंटिंग पण म्हटले जाते.

 बिहारच्या मिथीला प्रदेशातून (म्हणजे उत्तर भारत) पासून सुरू झालेली मधुबनी पेंटिंग मूळ रामायणाच्या काळातील आहे असे म्हणतात. असे म्हटले जाते की राजा जनक आपली कन्या सीता हिचा विवाह भगवान राम यांच्याशी करण्याचा ठरवला. तशी जनक राजांनी लग्नाची तयारी सुरू केली आणि कारागिरांना सुंदर अशा कलाकृतींनी म्हणजेच मधुबनी पेंटिंग नी राजवाडा सुशोभित करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे मधुबनी पेंटिंग अस्तित्वात आली

जुन्या काळात ग्रामीण महिला काही मंगल कार्य असल्यावर त्यांच्या झोपड्या मधुबनी पेंटिंग नी सजवत असत. मधुबनी पेंटिंग मध्ये मुख्यतः हिंदू देवतांचे चित्र रेखाटले जाई. उदाहरणार्थ राम, कृष्ण,दुर्गा माता, शिव ,सरस्वती या धार्मिक देवांच्या कथा चे वर्णन केले जात. लग्नसमारंभ असो किंवा शाही दरबार, तो मधुबनी पेंटिंग नी सजवला जाईत्यामध्ये चंद्र, सूर्य, तुळशी; नैसर्गिक चित्रांचा पण समावेश असायचा. मधुबनी पेंटिंग ही पूर्णपणे भरलेली असते त्यात कोणतीही रिकामी जागा सापडत नाही. कलाकारांना रिकामी जागा आढळली तर त्यामध्ये ते फुले, पक्षी, भूमिती आकृती आणि प्राणी यांचा समावेश करून मधुबनी पेंटिंग पूर्ण करत असत.

 

थोडक्यात, आपण आता मधुबनी पेंटिंग चे प्रकार बघू:

1. कायस्थ (Kayastha)या प्रकारामध्ये शक्यतो प्राणीजीवन आणि मनुष्यजीवन यांचे वर्णन केले जाते. यासारख्या पेंटिंग, आपल्याला घराच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरल्या जातात

 

2. Bharniभरणी या चित्रामध्ये मुख्यतः कृष्ण, दुर्गा माता, काली माता आणि विष्णू या हिंदू देवतांच्या धार्मिक महाकाव्यातील कथा आणि त्यांचे जीवन दर्शवतात.

 

3. Tatooजमुना देवी ही पहिली दलित (म्हणजे अनुसूचित जाती) म्हणून ओळखली जाते. यांनी या कलेवर प्रत्यक्षात काम सुरू केले. हे मधुबनी पेंटिंग चे स्वरूप आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. या प्रकारच्या चित्रांमध्ये चंद्र, सूर्य आणि राहू यांच्या कथांची चित्र रेखाटले जाते.

 

मधुबनी कलेचे आकर्षक गुण हे आहे कि ही पेंटिंग त्या काळाच्या कसोटीवर आधारित कलांपैकी एक आहेत, तरी आजही ही पेंटिंग टिकून आहे. म्हणून आजकाल ही पेंटिंग सुती किंवा रेशीम कपड्यावर केली जाते. पेंटिंग बनवताना आपण ब्रश,पेन ,बांबूच्या काड्या आणि हाताच्या बोटाच्या साहाय्याने ही पैंटिंग बनवू शकतो. त्याकाळात पेंटिंग रंगवण्यासाठी तांदूळ पावडर, नैसर्गिक रंग ,वनस्पतींचा लगदा यांचा वापर केला जायचा. असं म्हणतात की ही पेंटिंग हजारो वर्षापूर्वीची आहे. पण, आपण आजही ही पेंटिंग Acrylic कलर पासून सहज बनवू शकतो.

 

 

– Monali Thakur

(HOD, Fashion Designing,

DIDT Campus)