आमचं विश्व

बारावी नंतर, इंटेरियर करायचं ठरले आणि नाशिक मधील सर्व कॉलेज ला भेटी देऊन झाल्या आणि पहिल्या भेटीतच आवडलेल्या DIDT Campus मध्ये माझा प्रवेश झाला.

 

DIDT म्हणजेच धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी.

 

कॅम्पस, मोठ मोठ्या युनिव्हर्सिटी कॅम्पस सारखा नाही परंतु छोट्या जागेत space saving and organization चे बेस्ट उदाहरण ठरते. कॉलेज चे इंटेरियर म्हणजे इंटेरियर विद्यार्थ्यांसाठी एक चांगले उदाहरण. तसेच फॅशन डिझायनिंग साठी, हे फक्त वर्गच न घेता वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले फॅशन शो नेहमीच आकर्षण ठरते. फॅशन शोज मध्ये विद्यार्थ्यांना नव-नवीन संधी उपलब्ध होतात. तसेच स्टेज डिझाईनचे धडेही इंटेरियर च्या विद्यार्थ्यांना मिळतात. असे सर्व निरीक्षण आणि माहिती मिळवून मी कॉलेजला जायला तयार होते.

 

कॉलेजचा पहिला दिवस, सगळं काही नवीन होते. अगदी सोबत असलेले विद्यार्थीही परंतु मुख्याध्यापक अनिल बागुल सरांनी आमचे छान से वेलकम केले आणि दत्ता सरांनी आमच्याशी संवाद ही साधला. दत्ता सर म्हणजेच आमचे उपमुख्याध्यापक. पहिल्याच दिवशी आम्ही सगळेच रमलो, हळू हळू मिसळायला ही लागलो आणि दोन तीन दिवसात जुने मित्र मैत्रीण असल्या सारखे वावरायलाही लागलो. मग हळू हळू शिक्षकांनी शिकवायला सुरुवात केली. मोठे मोठे डेस्क, शीट आणि नवी टूल्स पाहून मनात थोडीशी भीती निर्माण झाली होती. ती भीती शिक्षकांनी अगदी छान प्रकारे काढून टाकली आणि आमची व टूल्स ची चांगली मैत्री झाली.

 

 

कॉलेज मध्ये अभ्यास तर सुरू असतोच परंतु बागुल सर आणि दत्ता सर हे नेहमी विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देता यावं म्हणून धडपडत असतात. तसेच शिक्षकही वेगवेगळ्या अॅक्टिविटीज व गेम्स च्या माध्यमातून नवीन काहीतरी शिकवतात. यातून अनेक नवीन गोष्टीही शिकायला मिळतात.

 

आम्ही कॉलेज मध्ये नविन होतो म्हणून आमच्या सिनियर ने दिलेली फ्रेशर्स पार्टी ही अगदी भारी होती. या पार्टी तून आम्हा मुलांची अजून घट्ट मैत्री झाली आणि कला दाखवण्याची संधी मिळाली. तसेच अभ्यासातून विरंगुळा म्हणून वेग- वेगळे डेज साजरे करणे व पार्टीज यामुळे मन फ्रेश राहते.

 

 

कॉलेज मधील शिक्षक फक्त शिक्षक नसून ते आमचे कौटुंबिक सदस्य असल्यासारखे आमच्या सर्व अडचणी समजून घेऊन आम्हाला मदत ही करतात. कॉलेज मध्ये थियरी सह प्रॅक्टिकल आणि e-learning चे धडे ही दिले जातात. अभ्यासासाठी, महिन्यातून एकदातरी इंडस्ट्रियल भेट दिली जाते. कॉलेज च्या माध्यमातून गेस्ट लेक्चर ही होतात आणि वेगवेगळ्या हस्तींशी भेट ही होते. या हस्तींना भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला की आपले ध्येय निश्चित होते आणि आत्मवि्वास वाढतो. आज कॉलेज मुळेच आम्ही सायबर साक्षर झालो.

कॉलेज मध्ये अगदी वॉचमन अंकल पासून ते शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू असते की त्यामुळे एक positivity निर्माण होते. अशा positive वातावरणात शिक्षक विद्यार्थ्यांना आनंदाने शिकवतात. दर शनिवारी, दत्ता सर, सर्व विद्यार्थी मिळून, CPS म्हणजे Communication Personality Skill चे म्हणजेच चार भिंतीच्या बाहेर वावरण्याचे, वागण्याचे धडे देतात. हा शनिवार आमचा जरा जास्तीच लाडका असतो.

 

 

कॉलेज मध्ये शैक्षणिक धड्यांसोबत आयुष्याचे ही धडे मिळतात, म्हणून मी अभिमानाने सांगते…..मला माझी कला दाखवण्यासाठी आणि भविष्य घडवण्या साठी ….चांगलंच…. Best Campus मिळालय….

 

-Krushnali Muley

1st Year, B.Sc. Interior Designing

 

12 thoughts on “आमचं विश्व”

  1. Kya baat hai…. Badhiya….. You have very nicely projected your thoughts Krushnali…. Hope to hear from you more….

  2. Madhura Deshpande

    Exactly right Krishnali we are really very lucky we learn in DIDT.
    Thank you DIDT

Comments are closed.