इंटेरियर डिझाईन काळाची गरज

आजकाल वाढत्या गरजांबरोबर फॅशन व डिझाईनिंग हि सुद्धा एक गरज झाली आहे. आजच्या कार्पोरेट व प्रोफेशनल युगामध्ये आपण जेवढा केवढा वेळ एखाद्या ठिकाणी घालवतो ती जागा आणि त्या जागेचे वातावरण म्हणजेच Ambiance आपल्याला खूप काही देतो. मग ते रेस्ट्रॉरंट असेल, आपलं ऑफिस असेल, खरेदी करण्याकरिता भव्य इमारतीतील एखाद देखणं तारांकित स्टोअर असेल किंवा तुमचं – आमचं सुंदर घर असेल.
” वातावरण जेवढ पॉझिटिव्ह तेवढा आपला मूड छान” हे अगदी साधं समीकरण आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम साहजिकच आपल्या रोजच्या कामामध्ये दिसतो.
आजकालच्या वाढत्या स्पर्धेमुळे जागा खूप कमी उपलब्ध असतात. मग अशावेळी मिळालेल्या जागेचा पुरेपूर वापर करणं हे एक तंत्रच आहे.
“Creatieaplace in available space!”
आपल्या कारियरची निवड कशी करावी?
इंटेरियर डिझाईन कि इंटेरियर डेकोरेटर? असा प्रश्न केला तर दोन शब्दांमधील फरक आपल्या लक्षात येतो. इंटेरियर डेकोरेटर हा ३ ते ६ महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स आहे. तर इंटेरियर डिझाईनिंग हि तीन वर्षाची पदवी आहे. बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून मिळालेलं शिक्षण! अर्थातच त्याच महत्व तेवढं!
डिझाईनिंग हे क्षेत्रच मुळात असं आहे की, कधीही न संपणारं ……… आपल्या कल्पकतेला वाव देणारं!
डिझाईन करिता बाजारात रोज निरनिराळी मटेरिअल्स व त्यांना वापरण्याची स्किल उपलब्ध होतात. साहजिकच आपण एक प्रोफेशनल डिझायनर म्हणून रोज अपडेट होतोच.
DIDT चीच निवड का करायची?
DIDT हे डिझाईनिंग क्षेत्रातील असं विश्व् आहे, जिथे विद्यार्थ्याने एकदा प्रवेश घेतला कि एक परिपूर्ण प्रोफेशनल व्यक्ती बनूनच बाहेर पडणार. असं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेलं, सर्व सोई युक्त असलेलं जणू गुरुकुलच!
विद्यार्थ्यांच्या करियरसाठी कॉलेजचे संचालक श्री अनिल बागुल सर स्वतः खूप पुढाकार घेतात. वेगवेगळ्या फॅशन शो मध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःचे डिझाइन्स बाजारात सिद्ध करण्याची संधी ते नेहमीच उपलब्ध करून देतात. इंटिरियर डिजाईन विद्यार्थ्यांकरिता “मशार्ट” नावाने प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला ते भरपूर प्रोत्साहन देतात. त्यांच्याबरोबर कॉलेजचे सर्व प्रोफेसर हे उच्चशिक्षित व अनुभवी आहेत. त्यांच्याकडून मुलांना नेहमीच योग्य मार्गदर्शन मिळत असते. आपल्या विषयाचा संपूर्ण अभ्यास हा विद्यार्थ्यांकडून अतिषय खेळीमेळीच्या वातावरणात कॉलेजमध्येच पूर्ण करून घेतला जातो.
फॅशन क्षेत्रातील करियर साठीही DIDT एक उत्तम संधी आहे.