The excitement DIDT had to meet our wonderful Marathi superstars was beyond definable. Tejaswini Pandit and Ankush Chaudhary were the wonderful actors, we had invited for our Eternal Elegance – 2017 fashion show, to be conducted at Sula Wines on 23rd December. Check out the videos by the super excited superstars themselves. Also, our CEO, Mr. Anil Bagul, had penned beautiful lines about our very own ‘तेजू and ‘अतरंगी देवा’, do read it.
मी तिच्या प्रेमात आहे …
उंचापुरा बांधा, घायाळ करणारी नजर, मादक नशीला आवाज, गोरापान आरस्पानी चेहरा.
तिच्या प्रेमात न कोणी पडलं तर त्याला वेड्यातच काढावं !
तो मैफिल ए दोस्त हम भी उसके आशिक है !
मी तिच्या प्रेमात आहे …
असं प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षक नक्कीच म्हणत असणार.
अशी ही, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी ‘तेजस्विनी पंडीत’ – ‘तेजू’ येतेय आपल्या भेटीला.
२३ डिसेंबरला नाशिकला !!
अतरंगी देवा, नाशिकला येतोय …
ही काय नवीन भानगड आहे बुवा ? प्रश्न तर पडायलाच हवा.
टायटलच सॉलिड ना राव!
सांगतो, सांगतो सगळं कसं उलगडून सांगतो, जरा दम धरा की …
त्या आधी मला सांगा, मराठी फिल्म्स इंडस्ट्री मधील पाच हिरोंची नावं ?
सांगताय ना.
कुठून सुरवात करताय? अहं ! हिरो म्हणजे हिरोच !!
हिंदीत कसे राज, दिलीप, देव आनंद पासून ह्रितिक पर्यंत लिस्ट येते, अर्थात तीन खान धरून.
तसे स्टारडम असणारे मराठीतले हिरो सांगा.
इथे कुणालाही कमी लेखण्याचा वा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. पण दादा कोंडके,लक्ष्मीकांत….
पिक्चर्स हिट दिले मान्य… पण हिरो शोधतोय ना आपण !
उंचापुरा, देखणा छान नाचू शकणारा आहे कोणी.
मान्य करायलाच हवं. एक रवींद्र महाजनी सोडलं तर दुसरं नाव सांगणं अवघड आहे.
ह्याचं कारण हेही आहे की मराठी चित्रपट चालतात ते आशयघन कथा, सुमधुर संगीत आणि अर्थपूर्ण गाणी ह्यामुळे.
मधल्या काळात त्याचा दुष्काळ पडला आणि मराठी चित्रपट सृष्टी ला घरघर लागली.
आणि मग तो आला त्याने पाहिलं आणि तो मराठीतला पहिला वाहिला स्टार हिरो झाला.
Some Glimpse of this Event :
[maxbutton id=”1″ url=”https://www.facebook.com/search/top/?q=didt%20campus%20ee2k17″ text=”More Photos on Facebook” ]
[maxbutton id=”1″ url=”https://didtcampus.com/videos/” text=”Videos” ]